मुंबई प्रतिनिधी
नाताळ आणि नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने तब्बल 76 विशेष गाड्यांची मेगा घोषणा केली आहे. कोकणपट्टीसह नागपूर, अमरावती, सांगानेर, तिरुवनंतपुरम या लोकप्रिय मार्गांवर धावणाऱ्या या गाड्यांचे वेळापत्रक रेल्वे प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले. सुट्टीच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
सीएसएमटी–करमळी दैनिक विशेष: 36 फेऱ्या
कोकण किनाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रवासाची गरज लक्षात घेऊन सीएसएमटी–करमळी दरम्यान विशेष गाड्या DAILY धावणार आहेत.
CSMT → करमळी (01151)
कालावधी: 19 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026
सुटणे: रात्री 00.20
आगमन: दुपारी 13.30
एकूण: 18 सेवा
करमळी → CSMT (01152)
कालावधी तेच
सुटणे: 14.15
आगमन: पुढील दिवशी 03.45
एकूण: 18 सेवा
LTT–तिरुवनंतपुरम साप्ताहिक विशेष: 8 फेऱ्या
LTT → तिरुवनंतपुरम (01171)
प्रत्येक गुरुवारी, 18 डिसेंबर 2025 – 8 जानेवारी 2026
सुटणे: 16.00
आगमन: पुढील दिवशी 23.30
4 सेवा
तिरुवनंतपुरम → LTT (01172)
प्रत्येक शनिवारी, 20 डिसेंबर – 10 जानेवारी
सुटणे: 16.20
आगमन: तिसऱ्या दिवशी 01.00
4 सेवा
LTT–मंगळुरू साप्ताहिक विशेष: 8 फेऱ्या
LTT → मंगळुरू (01185)
प्रत्येक मंगळवारी, 16 डिसेंबर – 6 जानेवारी
सुटणे: 16.00
आगमन: दुसऱ्या दिवशी 10.05
मंगळुरू → LTT (01186)
प्रत्येक बुधवारी, 17 डिसेंबर – 7 जानेवारी
सुटणे: 13.00
आगमन: पुढील दिवशी 06.50
CSMT–नागपूर साप्ताहिक विशेष: 6 फेऱ्या
CSMT → नागपूर (01005)
प्रत्येक शनिवारी, 20 डिसेंबर – 3 जानेवारी
सुटणे: 00.30
आगमन: 15.30
नागपूर → CSMT (01006)
त्याच कालावधीत शनिवारी
सुटणे: 18.10
आगमन: पुढील दिवशी 08.25
पुणे–नागपूर साप्ताहिक गाड्या: 6 फेऱ्या
पुणे → नागपूर (01401)
प्रत्येक शुक्रवारी, 19 डिसेंबर – 2 जानेवारी
सुटणे: 20.30
आगमन: पुढील दिवशी 14.05
नागपूर → पुणे (01402
प्रत्येक शनिवारी
सुटणे: 16.10
आगमन: पुढील दिवशी 11.45
पुणे–सांगानेर सुपरफास्ट: 6 फेऱ्या
पुणे → सांगानेर (01405)
प्रत्येक शुक्रवारी, 19 डिसेंबर – 2 जानेवारी
सुटणे: 09.45
आगमन: पुढील दिवशी 06.45
सांगानेर → पुणे (01406)
प्रत्येक शनिवारी
सुटणे: 11.35
आगमन: पुढील दिवशी 09.30
पुणे–अमरावती साप्ताहिक विशेष: 6 फेऱ्या
पुणे → अमरावती (01403)
प्रत्येक शनिवारी, 20 डिसेंबर – 3 जानेवारी
सुटणे: 19.55
आगमन: पुढील दिवशी 09.25
अमरावती → पुणे (01404)
प्रत्येक रविवारी, 21 डिसेंबर – 4 जानेवारी
सुटणे: 12.00
आगमन: पुढील दिवशी 00.15
तिकीट बुकिंगची महत्त्वाची माहिती
01403 आणि 01404 चे आरक्षण 10 डिसेंबरपासून सुरू.
इतर सर्व गाड्यांचे बुकिंग सुरू आहे.
सर्व आरक्षण केंद्रे व IRCTC वेबसाइटवर तिकीट उपलब्ध.
अनारक्षित डब्यांची तिकिटे UTS अॅपद्वारे मिळू शकतात.
नाताळ–नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये मोठी गर्दी अपेक्षित असल्याने इच्छुक प्रवाशांनी लवकरात लवकर आरक्षण करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. विविध मार्गांवरील वाढीव विशेष गाड्यांमुळे सुट्टीच्या काळातील प्रवास अधिक सुकर आणि सोयीस्कर होणार आहे.


