मुंबई प्रतिनिधी
तरुणांसाठी नवीन वर्षात रोजगाराची मोठी संधी उघडणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून तब्बल 2300 हून अधिक पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. क्लर्क (लिपिक), शिपाई, स्टेनोग्राफर आणि चालक या विविध पदांसाठी ही भरती असून, १० वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना या भरतीत सहभागी होता येणार आहे.
उमेदवारांना १५ डिसेंबर २०२५ पासून ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. अर्ज bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटवर स्वीकारले जाणार आहेत.
पात्रता काय आहे?
मुंबई हायकोर्टाच्या विविध पदांनुसार पात्रतेचे वेगळे निकष आहेत:
क्लर्क (लिपिक): मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच वैध टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक.
शिपाई: १० वी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक.
चालक (Driver): १० वी उत्तीर्ण, वैध एलएमवी परवाना आणि तीन वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव अनिवार्य.
स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड): पदवी, 80 wpm शॉर्टहँड व 40 wpm टायपिंग स्पीड आवश्यक.
स्टेनोग्राफर (हायर ग्रेड): पदवी, 100 wpm शॉर्टहँड व 40 wpm टायपिंग स्पीड आवश्यक.
सविस्तर पात्रता नियमांसाठी उमेदवारांनी हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली जाहिरात तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी १८ ते ३८ वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित असून, राखीव प्रवर्गांना नियमांनुसार सवलत देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन या टप्प्यांद्वारे करण्यात येईल.
पगार काय मिळेल?
क्लर्क: ₹29,200 – ₹92,300
स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड): ₹49,100 – ₹1,55,800
स्टेनोग्राफर (हायर ग्रेड): ₹56,100 – ₹1,77,500
अर्ज कसा कराल?
1. bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. “Recruitment” विभागात जा.
3. संबंधित भरतीची जाहिरात आणि “Apply Online” लिंक उघडा.
4. सर्व माहिती अचूक भरून फोटो व सही स्कॅन करून अपलोड करा.
5. पदानुसार आवश्यक अर्ज शुल्क भरावे.
6. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट जतन करा.
मुंबई उच्च न्यायालयातील ही मेगा भरती अनेक तरुणांसाठी स्थिर नोकरीची सुवर्णसंधी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


