
पुणे:प्रतिनिधी
एखादा क्राईम सपेन्स सिनेमा आपण मन लावून पाहतो. या सिनेमात आरोपीचा शोध पोलीस कशा पद्धतीने घेतात हे पाहणे इन्ट्रेस्टिंग असते. कधी कधी एखाद्या गुन्ह्यात जिथे पोलिसांना गुन्हेगाराचा सूगावा घ्यायचा असतो.
तिथे मग पोलिसांना पोलीस दलातील श्वानांची मदत घ्यावी लागते.
हे श्वान घटनास्थळावरून आरोपींचा माग घेत पोलिसांना त्यांच्याविषयी एखाद क्ल्यू देतात. ज्यावरून पोलिसांना तपास करणे सोपे जाते. पुणे बॉम्बशोधक नाशक पथकात गेल्या दहा वर्षांपासून पोलिसांची तपास पथकात आपली कामगिरी बजावणाऱ्या तेजा श्वाना आता निवृत्ती घेत आहे. त्याला पोलिसांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. गेल्या १० वर्षांत तेजाची पोलिसांना मोठी मदत झाली आहे. त्याच्या निवृत्ती निमित्तीने शिवाजीनगर येथील बॉम्बशोधक नाशक पथकाच्या पोलिसांच्या वतीने त्याचा विशेष समारंभ घेण्यात आला.
तेजा श्वानने पंतप्रधान बंदोबस्त तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तात महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. दि. ११ जानेवारी २०१५ मध्ये तेजाचा जन्म झाला. त्यानंतर काही महिन्यातच त्याचा पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक नाशक पथकात समावेश करण्यात आला. शिवाजीनगर येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या सीआडीत त्याला प्रशिक्षण देण्यात आले. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तेजाचा बॉम्बशोधक नाशक पथकात समावेश करण्यात आला. निवृत्तीनंतर त्याला श्वानप्रेमी किंवा संस्थेकडे सोपविले जाणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या पात्रतेचे निकष पूर्ण केले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील जी-२० परिषदेच्या बंदोबस्तासह देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तात कामगिरी
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्त, संशयित वस्तू, स्फाेटकांची तपासणी, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची नियमित तपासणी, तसेच गंभीर गुन्ह्याच्या तपासात सहभाग
पालखी आणि गणेशोत्सवात महत्वाची भूमिका बजावली आहे.