
पालघर:प्रतिनिधी
मोटार वाहन अपघातात आळा बसावा, नागरिकांमध्ये वाहतूकीच्या नियमांच्या प्रचार प्रसार व्हावा यासाठी याही वर्षी १ जानेवारी २०२५ ते ३१जानेवारी २०२५ या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अभियान संपूर्ण पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. महत्वाच्या ठिकाणी बॅनर लावले, डायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी जनजागृती करणे, शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे मुख्य रस्त्यावर बॅनर लावणे, शाळेच्या मुलांची फेरी काढून ठिकठिकाणी जनजागृती करणे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे, अशा अनेक जनजागृती वाहतूक पोलीस विद्यार्थी नागरिक यांच्या माध्यमातून संपूर्ण पालघर जिल्ह्यात करण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आव्हान केले आहे की नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सर्व अभियान राबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.