
मुंबई प्रतिनिधी
भारतीयांना भावलेली आणि 90 च्या दशकात रस्त्यांवर आपला स्वतंत्र दबदबा निर्माण करणारी टाटा सिएरा पुन्हा एकदा दमदार अवतारात येण्यासाठी सज्ज झाली आहे. टाटा मोटर्सने या आयकॉनिक एसयूव्हीचे मोठे पुनरागमन जाहीर केले असून 25 नोव्हेंबर 2025 रोजी ती भारतीय बाजारात सादर केली जाणार आहे. या घोषणेनंतर कारप्रेमींमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.

क्लासिक ओळख कायम ठेवत आधुनिक स्पर्श
नव्या सिएराच्या डिझाइनमध्ये जुन्या मॉडेलचा रेट्रो अंदाज राखत आधुनिकतेचा आकर्षक संगम साधण्यात आला आहे. कर्व्ड रिअर विंडोज, बॉक्सी व्हील आर्चेस, शार्प LED हेडलॅम्प्स यांसह पॅनोरमिक ग्लास रूफ आणि नवीन अलॉय व्हील्समुळे सिएराला मस्क्युलर व प्रीमियम लुक प्राप्त झाला आहे.
लक्झरीचा अनुभव देणारे इंटीरियर
कॉकपिट आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असेल. तीन 12.3-इंची स्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल व एम्बिएंट लायटिंग यांसारखी वैशिष्ट्ये मिळण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या आरामाला प्राधान्य देत कंपनीने केबिन अधिक प्रशस्त व प्रीमियम बनवला आहे.
इंजिन व परफॉर्मन्स
टाटा सिएरा 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह (170 bhp) बाजारात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय डिझेल व्हेरिएंट आणि नंतर इलेक्ट्रिक अवतारही उपलब्ध करण्याच्या कंपनीच्या तयारीची माहिती मिळत आहे. शक्तिशाली परफॉर्मन्ससोबत चांगले मायलेज देण्याचा टाटाचा दावा आहे.
किंमत आणि स्पर्धा
नव्या सिएराची अंदाजित किंमत १२ ते २० लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. या श्रेणीत ती Hyundai Creta, Kia Seltos, Mahindra Scorpio-N आणि Maruti Grand Vitaraला थेट स्पर्धा देणार आहे. डिझाईन, फिचर्स आणि सेफ्टीच्या आधारे ही SUV ‘व्हॅल्यू फॉर मनी’ ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
टाटा सिएराचे हे पुनरागमन केवळ मॉडेलचे नाही, तर भारतीय कार प्रेमींच्या आठवणींना ताजेतवाने करणारा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया उद्योगातून व्यक्त होत आहे.


