
जयपूर, प्रतिनिधी
राजधानीतील नामांकित नीरजा मोदी शाळेत एका विद्यार्थिनीने शनिवारी सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शाळेतच ही घटना घडल्याने शिक्षणविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीने आत्महत्या का केली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून विविध कोनातून चौकशी सुरू आहे.
नीरजा मोदी स्कूल….!!
स्कूल वालों ने CCTV फ़ुटेज शेयर किया…
विडियो क्रॉप किया हुआ दिख रहा है…
जिसमें अमायरा खुद चौथी मंज़िल की रैलिंग पर चढ़ रही है
और वहाँ से छलांग लगा रही है…
लेकिन उस वक़्त कोई व्यक्ति बच्ची के पीछे खडा नज़र आ रहा है…
वो चाहता तो बच्ची को रोक सकता… pic.twitter.com/o6YRIkxJQG
— kapil bishnoi (@Kapil_Jyani_) November 2, 2025
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना शाळेच्या वेळेतच घडली. विद्यार्थिनीने जिन्यांलगतच्या भागातून छतावर चढत सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यात विद्यार्थिनी रेलिंग ओलांडताना दिसत आहे. पडताना झालेल्या गंभीर जखमांमुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, शाळा व्यवस्थापनावर पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ज्या ठिकाणी विद्यार्थिनी पडली तेथे पाणी टाकून साफसफाई करण्यात आली. रक्ताचे डाग पुसून काढल्याचीही माहिती समोर आली असून अजूनही काही हलके डाग दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शाळा प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जयपुर के नीरजा मोदी स्कूल में छात्रा मायरा की मौत की खबर ने हर संवेदनशील दिल को झकझोर दिया है।
जहाँ से सपनों की उड़ान भरनी थी, वहीं एक मासूम ज़िंदगी ने हार मान ली — यह सोचकर रूह कांप उठती है।
उसकी सहपाठियों के अनुसार, टीचर की प्रताड़ना से आहत होकर मायरा ने आत्महत्या की।
अगर यह… pic.twitter.com/yZIEgVQQ0g— Nirmal Choudhary (@NirmlChoudhary) November 1, 2025
काही विद्यार्थी व पालकांनी विद्यार्थिनीवर शिक्षकांकडून दबाव असल्याचा आरोप केला असला तरी त्याविषयी अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. पोलिसांनी विद्यार्थिनीचे सहाध्यायी, शिक्षक आणि शाळा प्रशासन यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शाळा सुरक्षेचे प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस सखोल चौकशी करत असल्याची माहिती मिळाली आहे.


