मुंबई प्रतिनिधी
देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह सरकारी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ओळखली जाते. लाखो ग्राहक या बँकेशी जोडलेले आहेत. आरबीआयनेही एसबीआयला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांपैकी एक म्हणून स्थान दिलं आहे. त्यामुळे एसबीआयच्या प्रत्येक निर्णयाकडे ग्राहकांचं लक्ष असतं.
दरम्यान, एसबीआय खातेदारांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एटीएममधून एका दिवसात किती रक्कम काढता येते, याबाबत अनेकांना अचूक माहिती नसते. त्यामुळे व्यवहार करताना अडचणी येतात. अशा ग्राहकांसाठी एसबीआयने वेगवेगळ्या डेबिट कार्ड्सनुसार ‘कॅश विथड्रॉल लिमिट’ निश्चित केली आहे.
• वेगवेगळ्या डेबिट कार्डनुसार पैसे काढण्याची मर्यादा
एसबीआय आपल्या ग्राहकांना विविध प्रकारची डेबिट कार्डे उपलब्ध करून देते. प्रत्येक कार्डची दैनंदिन कॅश विथड्रॉल लिमिट वेगळी आहे.
• Classic / Global Visa Debit Card – ₹40,000 प्रति दिवस
• Platinum Debit Card – ₹1,00,000 प्रति दिवस
• Gold International Debit Card – ₹50,000 प्रति दिवस
• MasterCard Classic Card – ₹25,000 प्रति दिवस
याशिवाय POS (खरेदी व्यवहार) साठीही स्वतंत्र मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, प्लॅटिनम कार्ड धारकांना POS द्वारे दिवसाला ₹2 लाखांपर्यंत व्यवहार करण्याची मुभा आहे.
• सुरक्षा उपाय : आता 10 हजारांपेक्षा जास्त रकमेवर ओटीपी आवश्यक
ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेचा विचार करून एसबीआयने अलीकडेच एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता एटीएममधून ₹10,000 पेक्षा जास्त रक्कम काढताना ओटीपी वेरिफिकेशन आवश्यक असेल. ही सुविधा सर्व एसबीआय एटीएममध्ये लागू करण्यात आली आहे.
या ओटीपी प्रणालीमुळे ग्राहकांच्या खात्यातील व्यवहार अधिक सुरक्षित झाले असून, फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
एसबीआय ग्राहकांनी आपल्या डेबिट कार्डच्या प्रकारानुसार कॅश लिमिट लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. चुकीचा अंदाज बांधून एटीएममध्ये वारंवार प्रयत्न केल्यास व्यवहार नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवहारापूर्वी कार्ड लिमिट तपासणे हितावह ठरेल.


