
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खास ठरली आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तब्बल ४७ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिली आहे. यात २३ अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) तर २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली. यासंदर्भातील शासन निर्णय आज (सोमवार, दि. २० ऑक्टोबर) रोजी जारी करण्यात आला.
या निर्णयामुळे अनेक अधिकाऱ्यांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पदोन्नतीचा प्रश्न सुटला असून, भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) जाण्याचा मार्गही त्यांच्यासाठी खुला झाला आहे.
“महसूल विभागामार्फत अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या जातात. या पदोन्नतीमुळे अधिकाऱ्यांचा उत्साह वाढून कामकाजाला अधिक गती मिळेल. पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देणे हेच आमचे ध्येय आहे. दिवाळीतच अधिकाऱ्यांना आनंदाचा गिफ्ट देण्यात आम्हाला आनंद वाटतो,” अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली.
पदोन्नतीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासूनच नवीन वेतनश्रेणी लागू होणार आहे.
• निवड श्रेणीतील अपर जिल्हाधिकारी म्हणून बढती मिळालेले अधिकारी
प्रज्ञा त्रिंबक बडे-मिसाळ (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नाशिक)
किरण बापु महाजन (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नांदेड)
रवीकांत कटकधोंड (खाजगी सचिव, मा. मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे)
प्रदिप प्रभाकर कुलकर्णी (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, गोंदिया)
जगन्नाथ महादेव विरकर (सदस्य सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
शिवाजी व्यंकटराव पाटील (विशेष कार्य अधिकारी, अपर मुख्य सचिव, महसूल, मंत्रालय, मुंबई)
दीपाली वसंतराव मोतीयेळे (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, भंडारा)
संजय शंकर जाधव (अपर आयुक्त, अमरावती विभाग)
प्रताप सुग्रीव काळे (अपर आयुक्त, छत्रपती संभाजीनगर)
निशिकांत धोंडीराम देशपांडे (प्रबंधक, राजभवन, मुंबई)
सुहास शंकरराव मापारी (प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय)
मोनिका सुरजपालसिंह ठाकूर (अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड मनपा)
स्नेहल हिंदूराव पाटील भोसले (निबंधक, सारथी, पुणे)
मंदार श्रीकांत वैद्य (खाजगी सचिव, मंत्री – पर्यावरण विभाग)
सरिता सुनिल नरके (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सांगली)
डॉ. राणी तुकाराम ताटे (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सोलापूर)
मृणालिनी दत्तात्रय सावंत (सहयोगी प्राध्यापक, यशदा, पुणे)
पांडुरंग शंकरराव बोरगांवकर (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, लातूर)
नरेंद्र सदाशिवराव फुलझेले (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, बुलढाणा)
सुषमा वामन सातपुते (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, कोल्हापूर)
अरूण बाबुराव आनंदकर (अतिरिक्त महासंचालक, महाऊर्जा, पुणे)
रिता प्रभाकर मेत्रेवार (अपर आयुक्त (महसूल), संभाजीनगर)
वंदना साहेबराव सूर्यवंशी (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, जालना)
• अपर जिल्हाधिकारी म्हणून बढती मिळालेले अधिकारी
मारुती भिकाजी बोरकर (बार्टी, पुणे)
श्रावण श्रीरंग क्षीरसागर (परभणी)
राजेंद्र मारुती खंदारे (मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय)
हेमंत विठ्ठल निकम (भूमी अभिलेख, पुणे)
अविनाश हरिश्चंद्र रणखांब (उपसभापती सचिवालय, विधानपरिषद)
तुकाराम देवराम हुलवळे (सिडको, नवी मुंबई)
अविनाश दशरथ शिंदे (नागपूर विभाग)
सुदाम अमरसिंग परदेशी (रोहयो, नाशिक विभाग)
निलेश चंद्रकांत जाधव (करमणूक विभाग, नाशिक)
सुजाता प्रितम गंधे-क्षीरसागर (भूसंपादन प्रकल्प, नागपूर)
रत्नदिप रामचंद्र गायकवाड (नांदेड)
नितीनकुमार भिकाजी मुंडावरे (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)
विजया विनायक बनकर (पुनर्वसन विभाग, नागपूर)
अंजली अभयकुमार धानोरकर (महानगर प्राधिकरण, संभाजीनगर)
नंदकुमार माधव कोष्टी (पुनर्वसन विभाग, पुणे)
सतिश ज्ञानदेव राऊत (पुणे)
अजय उत्तम पवार (नाविन्यता सोसायटी, मुंबई)
रमेश कारभारी मिसाळ (जालना)
अभिजित भालचंद्र घोरपडे (राज्य वातावरणीय कृती कक्ष)
अजित प्रल्हाद देशमुख (मंत्री कार्यालय)
गणेश केशव नि-हाळी (सोलापूर)
संजय बाबुराव तेली (वर्धा)
वासंती मारुती माळी (करमणूक विभाग, अमरावती)
संदीप जयवंतराव कोकडे-पवार (जलजीवन मिशन, बेलापूर, नवी मुंबई)
महसूल विभागाच्या कामकाजाला नवीन गती मिळेल
या पदोन्नतीमुळे महसूल विभागातील कार्यपद्धतीत गतिमानता येईल, असे प्रशासनातील जाणकारांचे मत आहे. गेल्या काही वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर शासनाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, हि आणि त्यामुळे महसूल विभागातील अनेक अधिकारी दिवाळी अधिक उजळल्याची भावना व्यक्त करत आहेत.