
मुंबई प्रतिनिधी
मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात कैद्यांमधील गँगवॉरने सुरक्षाकर्मींच्या धैर्याची परीक्षा घेतली. तुरुंग पोलिस अधिकारी राकेश चव्हाण कैद्यांमधील भांडण थांबवत असताना अचानक अयान सैफुद्दीन खान या कैद्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला.
हल्ल्यात राकेश चव्हाण यांचा डोळा फोडला गेला आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्वरित अतीरीक्त बंदोबस्त बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पोलिसांनी अयान सैफुद्दीन खान याला बळाचा वापर करून बॅरेकमध्ये बंद केले. ही घटना गँगवॉर असल्याचा पोलिसांचा संशय असून, पोलिस हल्ल्यामागील नेमका कारण शोधत आहेत. जखमी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आरोपी कैद्याविरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.