
स्वप्नील गाडे|
मुंबई : मूलभूत, चिंतनशील आणि सामाजिक दृष्ट्या क्रांतिकारी अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता होती, अशी प्रतिपादन राजकीय पत्रकार व लेखक श्रीकांत जाधव यांनी केले. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत पत्रकारिता’ या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, विचारसौदर्य हेच बाबासाहेबांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे खरे प्राणतत्त्व आहे.
मुंबईतील बोरिवली पूर्व येथील हनुमान टेकडी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ४४८, महिला मंडळ व प्रबुद्ध सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास मालिकेचा १२ वा पुष्प रविवार, २८ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. मुसळधार पावसातही कार्यक्रमास प्रचंड उपस्थिती होती. प्रमुख वक्ते श्रीकांत जाधव बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सचित कांबळे, चिटणीस नितीन शिर्के, नाता जाधव, प्रशांत जाधव, विजया जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
श्रीकांत जाधव यांनी सांगितले की, मूक समाजाला बोलत करण्यासाठी बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत जनता, प्रबुद्धभारत अशा वृत्तपत्रांची स्थापना केली. मूकनायक ते प्रबुद्धभारत हा वृत्तपत्रीय प्रवास म्हणजे त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनाचा प्रवास आहे. त्यांनी नमूद केले की, तत्कालीन शोषित समाजस्थितीशी तडजोड न करता समाज बदलण्याची जाणीव या वृत्तपत्रांनी प्रकट केली. बाबासाहेबांचा मानस आणि ध्येयवाद त्यांच्या लेखनातून स्पष्टपणे दिसून येतो.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण, पंचशील व बुद्धधम्म ग्रंथाचे सामूहिक पठण करून झाली.