
उमेश गायगवळे
डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळ स्थापन झाले मंत्रिमंडळ आणि खाते वाटपास झालेली दिरंगाई त्यात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट, यांच्याकडून मंत्रिपदासाठी झालेलं लॉबिग हे राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले समाधानकारक खाती न मिळाल्याने किंवा मलिदा खाती म्हणा न मिळाल्याने सुमारे 15 ते 20 मंत्र्यांनी आपल्या पदाचा पदभार 20 दिवसानंतरही आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला नाही. अशा बातम्या आहेत.
2024 च्या अखेरच्या डिसेंबर महिन्यात राज्यातील तीन चार घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, परभणीतील दलित युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू त्याचबरोबर पुण्यातील हडपसर येथील पत्नीने पाच लाख रुपये देऊन पतीची हत्या घडवून आणली. तसेच कल्यान येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार अशा घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असतानाच बीड सरपंच हत्या प्रकरणाने राजकीय वातावरण इतके तापले की दररोज विरोधी पक्ष नेत्यांनी आणि काही सत्ता पक्षातील आमदारानी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या 30 वर्षाचा बीड जिल्ह्याचा इतिहास समोर आला माध्यमांमध्ये एकच बातमी वीस दिवसापासून हेडलाईन झाली. त्याचे कारण तसेच होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे संबंध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अवती भोवती फिरत असताना मुंडे यांच्या जवळचे समजले
जाणारे वाल्मिकी कराड यांच्यावर देशमुख कोणाचा सूत्रधार असल्याचे सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी वाल्मिकी कराडला अटक करण्याची मागणी लावून धरली. या हत्या प्रकरणानंतर वाल्मिकी कराड गायब झाल्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं .मात्र आणखी काही आरोपी आणि मुख्य सूत्रधार यांना अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथके आणि सुमारे 150 अधिकारी पोलीस कर्मचारी गेल्या 22 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत होते. मात्र वाल्मिकी कराड काही हाती लागले नाहीत. सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून असल्याच्या बातम्या समोर येत होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगतले की आरोपींना गय केली जाणार नाही. कुणाला पाठीशी घालणार नाही.
30 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडवणीस यांची भेट घेतली आणि 31 डिसेंबर रोजी वाल्मिकी कराड यांनी दुपारी पुण्यात आत्मसमर्पण केले. यावरून आमदार सुरेश धस, छत्रपती संभाजी राजे जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे, संजय राऊत, यांनी वाल्मिकी कराडच्या आत्मसर्पणावरून शंका व्यक्त केली. वाल्मिकी कराडवर
मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद असताना बीड जिल्ह्यातील गेल्या 30 वर्षातील राजकारण समाजकारण गुंडगिरीचा पाढाच वाचून दाखवून खळबळ उडवून दिली. खंडण्या कशा उकळल्या जातात. याची जंत्रीच दस यांनी माध्यमासमोर मांडली . भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचे वाल्मिकी कराड शिवाय पान हालत नाही असे एका कार्यक्रमात जाहीर वक्तव्य केले होते त्यामुळे धनंजय मुंडे यांचे आणि वाल्मिक कराड यांचे किती जवळचे संबंध आहेत हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.
धनंजय मुंडे निवडणूक जि़ंकल्यानंतर परळीत कराड यांच्याबरोबर झालेली गळाभेट ही सर्वांचं लक्ष वेधून घेते. सरपंच देशमुख यांच्या हस्तेनंतर वाल्मिकी कराड गायब झाले. आरोपींना पकडण्यासाठी 150 अधिकारी, कर्मचारी त्यांचा तपास करत होते मात्र कराड पोलिसांना सापडू शकले नाहीत.
मंगळवारी दुपारी पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात सकाळपासूनच हालचालीने वेग आल्याने माध्यमानीच सांगितल्याने वाल्मिकी कराड स्वतः हजर होणार हे सिद्ध झाले? याचाच अर्थ सीआयडीला कराड यांनी कळवले होते का? या सर्व होणाऱ्या घडामोडी कुठेतरी संशयाला जागा ठेवणाऱ्या आहेत.
वाल्मिकी कराड यांना 14 दिवसाची कोठडी मिळाली असताना यातील खरे गुन्हेगार कोण? किंवा खुण्याचा सूत्रधार कोण? हे लवकरच जनतेसमोर येईलच मात्र महाराष्ट्राचा एक युवा सरपंच कुणाचातरी मुलगा होता, पती होता, भाऊ, वडील, होता हे पाहणे गरजेचे आहे.
अन्यथा महाराष्ट्राचा बिड व्हायला वेळ लागणार नाही….