
मुंबई प्रतिनिधी
श्लोक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई वार्षिक सर्वसाधारण सभा व जीवनगौरव सन्मान सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या सभा संस्थेच्या अध्यक्षा सौ.सविता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जीवनगौरव सन्मान सोहळा शिवाजीराव नलावडे साहेब अध्यक्ष व विद्यमान संचालक मुंबई सहकारी बँक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या सोहळ्यात ” एन. डी. चाळके साहेब” यांना जीवनगौरव सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
विशेष उपस्थिती आनंदराव माईंगडे संस्थापक दत्तसेवा
सहकारी पतसंस्था मर्या. मुंबई, अंकुश जाधव, संपादक पतसंस्था व्यवस्थापन डायरी, ईश्वर चव्हाण शासकीय लेखापरीक्षक, संभाजी भोसले संघटन प्रमुख सहकार भारती मुंबई पूर्व जिल्हा, किरण पवार अध्यक्ष खटाव तालुका को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, प्रकाश पाटील संचालक विद्याश्री क्लासेस व उपाध्यक्ष आनंद सहकारी पतसंस्था, संस्थेचे संस्थापक अविनाश पाटील यांनी संस्थेच्या कामकाजबाबत प्रस्तावना करून सभा सोहळ्याची सुरुवात केली.
सर्व मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणातून संस्थेच्या
कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. विशेषत जीवनगौरव सन्मानाच्या माध्यमातून संस्थेच्या कार्याची उत्कृष्ट परंपरा व सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. अमोल आसुळकर यांनी सुंदर सूत्रसंचालन करून कार्यक्रमात शोभा आणली, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठान यांनी लेझीम पथक, संबळ व तुतारीच्या माध्यमातून कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवली.