
पुणे प्रतिनिधी
अनंत चतुर्दशी निमित्त आज पुण्यातील वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकांचा सोहळा पार पडणार आहे. मानाच्या गणपतींच्या मिरवणुकींना सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार असून, पुणेकरांसाठी हा सोहळा नेहमीप्रमाणे उत्साहवर्धक ठरणार आहे.
शहरातील मानाचा पहिला गणपती म्हणून ओळख असलेला कसबा गणपती लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी ९.३० वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करणार आहे. त्यानंतर मानाच्या इतर मंडळांची मिरवणूक टप्प्याटप्प्याने मार्गस्थ होईल.
दरवर्षीप्रमाणे लक्षवेधी ठरणारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक संध्याकाळी ४ वाजता बेलबाग चौकातून सुरू होणार आहे. दगडूशेठ मंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी उसळते.
शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक पोलीस, नागरी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पुण्यातील ऐतिहासिक विसर्जन सोहळा निर्विघ्न होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मानाचे पाच गणपती या विसर्जन मिरवणुकीच्या प्रारंभी मार्गस्थ होणार असून, त्यांच्या मिरवणुकीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा आहे.
मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुकीच्या वेळेचं नियोजन कसं असेल पाहुया
* मानाचा पहिला गणपती कसबा गणपती
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.३० वाजता
बेलबाग चौक: १०.१५ वाजता
कुंटे चौक: ११.४५ वाजता
विजय टॉकीज चौक: १.४० वाजता
टिळक चौक: २.४५ वाजता
* मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.४५ वाजता
बेलबाग चौक: १०.३० वाजता
कुंटे चौक: १२ वाजता
विजय टॉकीज चौक: १.५५ वाजता
टिळक चौक: ३ वाजता
* मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १० वाजता
बेलबाग चौक: ११ वाजता
कुंटे चौक: १२.४५ वाजता
विजय टॉकीज चौक: २.३० वाजता
टिळक चौक: ३.३० वाजता
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.१५ वाजता
बेलबाग चौक: ११.३० वाजता
कुंटे चौक: १.३० वाजता
विजय टॉकीज चौक: ३ वाजता
टिळक चौक: ४ वाजता
* मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.३० वाजता
बेलबाग चौक: १२ वाजता
कुंटे चौक: २ वाजता
विजय टॉकीज चौक: ३.३० वाजता
टिळक चौक: ४.३० वाजता
* श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
बेलबाग चौक (सुरुवात): ४ वाजता
गणपती चौक: ४.५५ वाजता
कुंटे चौक: ६ वाजता
विजय टॉकीज चौक: ६.३० वाजता
टिळक चौक: ७.३० वाजता
* अखिल मंडई मंडळ
बेलबाग चौक (सुरुवात): ७ वाजता
गणपती चौक: ७.२५ वाजता
कुंटे चौक: ८.३० वाजता
विजय टॉकीज चौक: ९.२० वाजता
टिळक चौक: ११.२५ वाजता
* श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट
बेलबाग चौक (सुरुवात): ६.३० वाजता
गणपती चौक: ६.५५ वाजता
कुंटे चौक: ८ वाजता
विजय टॉकीज चौक: ९.४० वाजता
टिळक चौक: १०.४५ वाजता