
वांद्रे प्रतिनिधी
मुंबई | बांद्र्यातील प्रसिद्ध माऊंट मेरी यात्रा यावर्षी १४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या काळात लाखो भाविक चर्चला भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे परिसरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले असून काही रस्त्यांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
१४ सप्टेंबर रोजी रात्री १२.०९ वा. पासून ते २१ सप्टेंबर रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.
• एकदिशा मार्ग व बंद रस्ते
माऊंट मेरी रोड : दररोज सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत फक्त स्थानिक पासधारक रहिवाशी व आपत्कालीन वाहनांनाच परवानगी.
केन रोड : माऊंट मेरी रोडपासून बी. जे. रोडकडे एकदिशा वाहतूक.
परेरा रोड : पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी एकदिशा वाहतूक.
सेंट जॉन बॅप्टीस्ट रोड : दररोज सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत स्थानिक व आपत्कालीन वाहनांशिवाय इतर वाहनांना बंद.
कार्मेल चर्च : चॅपल रोडवरून वेरोनिका रोडकडे जाणारे उजवे वळण बंद.
• पार्किंगवरील निर्बंध
भाविकांच्या सोयीसाठी व गर्दी टाळण्यासाठी खालील रस्त्यांवर प्रवाशांच्या चढण्या-उतरण्याव्यतिरिक्त पार्किंगला सक्त मनाई असेल
माऊंट मेरी रोड, परेरा रोड, केन रोड, हिल रोड (सेंट पॉल रोड ते मेहबूब सर्कल), माऊंट कार्मेल रोड, चॅपल रोड, जॉन बॅप्टीस्ट रोड, सेंट सबेस्टीन रोड, रिबेलो रोड, डॉ. पिटर डायस रोड व सेंट पॉल रोड.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून गर्दी टाळण्याचे आवाहन केले असून यात्रेदरम्यान शिस्त राखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.