
मुंबई प्रतिनिधी
मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमातील १३५ शाळांमध्ये आजपासून ‘संपर्क स्मार्ट शाळा’ उपक्रमाला सुरुवात झाली. तब्बल १८ हजारांहून अधिक मुलांच्या शिक्षणात आता स्मार्ट क्रांती घडणार आहे. पहिली ते पाचवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना भाषा आणि गणिताचे आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन मिळणार आहे.
महापालिका मुख्यालयात झालेल्या या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त डॉ. प्राची जांभेकर, संपर्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनीत नायर आणि अध्यक्ष डॉ. के. राजेश्चर राव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अभ्यास अधिक सोपा, रोचक आणि परिणामकारक होणार असून शिक्षण क्षेत्रात ही पाऊलखूण ठरणार आहे.