
वांद्रे प्रतिनिधी
वांद्रे|शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वांद्रे पूर्व विधानसभा शाखा क्र. ९३ तर्फे आयोजित निष्ठेची दहीहंडी २०२५ च्या भव्य सराव शिबिराला उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी भेट देत सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. या वेळी वांद्रेचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई, शाखाप्रमुख अरुण कांबळे तसेच स्थानिक पदाधिकारी उत्साहात उपस्थित होते.
गोविंदा पथकांच्या जोशात अनिल परब यांची प्रेरणादायी भेट आणि शुभेच्छांनी निष्ठेच्या दहीहंडीची रंगत अधिकच वाढवली. परिसरात “जय गोविंदा! जय महाराष्ट्र!”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.