मुंबई प्रतिनिधी
भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. महाराष्ट्रात देखील या दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुंबईतील मंत्रालयात सकाळी ९.०५ वाजता तिरंगा फडकवला जाणार असून, पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, याची यादी निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय मंत्री आणि ठिकाणे
(प्रमुख नावे)
ठाणे – एकनाथ शिंदे
बीड – अजित पवार
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे-पाटील
गोंदिया – छगन भुजबळ
सांगली – चंद्रकांत पाटील
नाशिक – गिरीश महाजन
पालघर – गणेश नाईक
जळगाव – गुलाबराव पाटील
अमरावती – दादाजी भुसे
यवतमाळ – संजय राठोड
रत्नागिरी – उदय सामंत
जालना – पंकजा मुंडे
नांदेड – अतुल सावे
सातारा – शंभुराज देसाई
मुंबई उपनगर – आशिष शेलार
रायगड – आदिती तटकरे
लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
सोलापूर – जयकुमार गोरे
सिंधुदुर्ग – नितेश राणे
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर
गडचिरोली – आशिष जयस्वाल
वर्धा – डॉ. पंकज भोयर
परभणी – मेघना साकोरे-बोर्डीकर
(उर्वरित नावे अधिकृत यादीत)
उपस्थिती नसेल तर…
निश्चित मंत्री कोणत्याही कारणास्तव ध्वजारोहणाला गैरहजर राहिल्यास, विभागीय मुख्यालयात विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी तिरंगा फडकवतील. तर कोकण भवनात ध्वजारोहण कोकण विभागाच्या आयुक्तांच्या हस्ते होईल.


