
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई – गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या जल्लोषाच्या तयारीत असताना दहीसरमधील केतकीपाडा परिसरातून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. दहिहंडीचा सराव करत असताना फक्त ११ वर्षांच्या लहान गोविंदाचा जीव गेला! महेश रमेश जाधव असं या चिमुकल्या गोविंदाचं नाव. सरावादरम्यान झालेल्या अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच तो काळाच्या पडद्याआड गेला.
परिसरात शोककळा पसरली असून, पुन्हा एकदा “लहान गोविंदांच्या सुरक्षेचं काय?” हा ज्वलंत प्रश्न उभा राहिला आहे. अनेक पथके आजही हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, खाली जाड गादी अशा मूलभूत सुरक्षा साधनांशिवायच सराव करताना दिसतात. अशा निष्काळजीपणामुळे निरपराध जीव जातात, पण प्रशासन मात्र डोळेझाक करतं.
तज्ज्ञांचा इशारा स्पष्ट आहे — दहिहंडीच्या सराव व स्पर्धांसाठी सरकारने कठोर सुरक्षा नियम घालून त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली नाही, तर अशा शोकांतिका थांबणार नाहीत. लहान गोविंदांची सुरक्षितता ही केवळ जबाबदारी नाही, तर ती प्राथमिकता असायलाच हवी!