
मुंबई-प्रतिनिधी
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. यानंतर काँग्रेसने दिल्लीसह देशभरात आंदोलन केली आहेत. त्यानंतर भाजपही काँग्रेसविरोधात आक्रमक झाली आहे. याचाच भाग म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर दगडफेक आणि शाईफेक केली आहे. तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयातील खुर्च्यांचीही फेकफाक केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.