एर्नाकुलम (केरळ) –वृतसंस्था
हनीट्रॅप आणि खंडणीचा चंगळवादी खेळ… आयटी कंपनी मालकाला “तुझी चॅटिंग व्हायरल करीन” अशी धमकी देत तब्बल ३० कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विवाहित जोडप्याचा केरळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
नेमकं घडलं काय?
श्वेता बाबू आणि कृष्णा राज या पती-पत्नींनी काही महिन्यांपूर्वीच हा कट रचला होता. श्वेता ही आयटी कंपनीत १८ महिने कार्यरत होती. या काळात पतीच्या संगनमताने तिने कंपनीच्या मालकाला भावनिक जाळ्यात ओढले. खाजगी चॅट्सच्या आधारे कृष्णा राजने मालकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
धमक्या आणि मागणी
“तुझे श्वेतासोबत अनैतिक संबंध आहेत, तुझे खासगी संदेश व्हायरल करू, तुझी प्रतिमा मलिन करीन, तुझ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करीन” — अशा धमक्या देत आरोपींनी ३० कोटींची मागणी केली. तातडीने १० कोटी रुपये कृष्णाच्या खात्यात, उर्वरित २० कोटी चेकद्वारे देण्यास भाग पाडण्यात आले. दुसऱ्या दिवशी चेक घेण्यासोबतच त्यांनी रोख ५० हजारही उकळले.
पोलिसांचा सापळा
आयटी मालकाने पोलिसांकडे धाव घेताच पोलिसांनी जलदगतीने सापळा रचला. तक्रारीनुसार कारवाई करत श्वेता आणि कृष्णा राजला बेड्या ठोकण्यात आल्या. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं असून, कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
पुढील तपास सुरू
हा सगळा कट बंद पडलेलं हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आखला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


