
नवी दिल्ली प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने ग्राहकांना गोड सरप्राईज दिलं आहे. केवळ 1 रुपया मोजून 30 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 100 SMS मिळणार आहेत. या ‘फ्रीडम ऑफर’मुळे खासकरून नवीन ग्राहकांना बीएसएनएलकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.
‘खरी डिजिटल आझादी’ – BSNL ची फ्रीडम ऑफर
BSNL ने आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून या नव्या योजनेची घोषणा केली आहे.
* ऑफर कालावधी – 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट
* किंमत – फक्त ₹1
* व्हॅलिडीटी – 30 दिवस
* फायदे – देशभरात अमर्यादित कॉलिंग + दररोज 2GB डेटा + 100 SMS प्रतिदिन
उपलब्धता – केवळ नवीन BSNL सिम खरेदी करणाऱ्यांसाठी
देशभरात मर्यादित कालावधीसाठी ऑफर
ग्राहक कोणत्याही अधिकृत BSNL सेंटर, रिटेलर किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मधून नवीन सिम घेऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. सध्या डोअरस्टेप सिम डिलिव्हरी अंतर्गत ही योजना उपलब्ध असेल का याबाबत कंपनीकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
ग्राहकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न
TRAI च्या अलीकडील अहवालानुसार, BSNL आणि Vi ने मागील काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर ग्राहक गमावले आहेत. अनेकांनी आपले नंबर Airtel आणि Jio मध्ये पोर्ट केले आहेत. ही घट थांबवून ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी BSNL हा आक्रमक प्लॅन घेऊन आली आहे.
महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे
BSNL चा फुल फॉर्म – भारत संचार निगम लिमिटेड
* कंपनीचे स्वरूप – सरकारी
* अॅक्टिव्ह युजर्स – 57.10 मिलियन