
सातारा प्रतिनिधी न्यूज नेटवर्क
आरा (बिहार) : आरा सदर रुग्णालयात बुधवारी एक हृदय हेलावणारी घटना समोर आली. १५ वर्षीय मुलगा मोहित राज याने आत्महत्या केल्यानंतर त्याची आई, जी होमगार्डमध्ये कार्यरत आहे, रुग्णालयात धावत आली आणि मुलाच्या पार्थिवाजवळ अश्रूंनी भरून गेलेली माया सांडत त्याला जीवदान देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ती थरथरत वारंवार त्याला सीपीआर देत होती, तोंडाला तोंड लावत होती, पण तिचा मुलगा मात्र परत आला नाही.
आरा (बिहार) महिला होमगार्ड के इकलौते पुत्र ने लगाई फांसी डॉक्टरों ने किया मृत घोषित
मां की ममता भी न बचा सकी जान।
उठ जा बेटा, देख मम्मी आ गई है। वर्दी में मां कभी सीपीआर देती, कभी हाथ-पैर रगड़ती।
मुंह से सांस देकर बार-बार कहती- उठ जा बेटा,
देख तेरी मम्मी आ गई है। pic.twitter.com/jV9V05mfmB— शेखर सिंह (@Harvindra24) July 31, 2025
मोहित नवादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडना रोड परिसरात राहणारा होता. शाळेतून घरी आल्यानंतर त्याने खोली बंद करून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. नातेवाइकांनी दरवाजा उघडून पाहिल्यावर धक्का बसला. त्याला तातडीने आरा सदर रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मोहितची आई जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असून, त्या वेळी ती ड्युटीवर होती. घटनेची माहिती मिळताच ती रुग्णालयात धावत आली. तिने रडत, हंबरडा फोडत देवाकडे प्रार्थना केली, आणि मुलाच्या छातीवर हात ठेऊन सीपीआर देत राहिली. पण दुर्दैवाने, तिच्या हातून काळ फिरवता आला नाही.
दरम्यान, आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. घरात शोककळा पसरली आहे. रुग्णालयातील सर्वचजण या दृश्याने सुन्न झाले.