
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील पोलीस यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने तब्बल ६५ सहायक पोलीस आयुक्त/उप विभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांची बदली केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या तर नऊ नवीन अधिकाऱ्यांची पुण्यात बदली झाली आहे.
पुण्यातून बदली झालेले अधिकारी
* तानाजी बर्डे – उप विभागीय पोलीस अधिकारी, भोर → सहायक पोलीस आयुक्त, मुंबई
* अश्विनी राख – सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर → पोलीस उप अधीक्षक, पोलीस अकादमी, नाशिक
* विजय चौधरी – अपर पोलीस अधीक्षक, लाच लुचपत, पुणे → सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई
* प्रवीणचंद्र लोखंडे – पोलीस उपअधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा → उप विभागीय पोलीस अधिकारी, कर्ज, जि. अहिल्यानगर
पुण्यात नव्याने आलेले अधिकारी
* डॉ. शितल जानवे – अपर पोलीस अधीक्षक, लाच लुचपत, पुणे → पुणे शहर
* अजित पाटील – पदस्थापनेच्या प्रतिक्षेत → अपर पोलीस अधीक्षक, लाच लुचपत, पुणे
* अर्जुन भोसले – उप विभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर → अपर पोलीस अधीक्षक, लाच लुचपत, पुणे
* धनंजय पाटील – सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर → उप विभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर
* संगिता अल्फान्सो शिंदे – पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, पालघर → सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर
* अश्विनी शेंडगे – उप विभागीय पोलीस अधिकारी, दहीवडी, सातारा → पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे
* विजयालक्ष्मी कुरी – पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय, सोलापूर ग्रामीण → सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर
* शंकर खटके – अपर पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण, पुणे → सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर
* गजानन टोम्पे – उप विभागीय पोलीस अधिकारी, पेण, रायगड → उप विभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा
या बदल्यांमुळे पुण्यातील पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल होणार असून, नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांना गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.