
मुंबई प्रतिनिधी
ऑनलाइन शॉपिंगप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. वार्षिक स्वातंत्र्यदिन सेलच्या निमित्ताने ई-कॉमर्स दिग्गज ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी आपल्या ‘फ्रीडम सेल’ची घोषणा केली आहे. स्मार्टफोन्सपासून इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेट्स, फॅशन आणि होम अप्लायंसेसपर्यंत ग्राहकांना भरघोस सूट मिळणार आहे.
कधी सुरु होणार सेल?
ॲमेझॉनचा ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 31 जुलैपासून सुरु झाला असून, प्राइम मेंबर्ससाठी 30 जुलैपासूनच अर्ली ॲक्सेस उपलब्ध होता. तर फ्लिपकार्टचा फ्रीडम सेल 1 ऑगस्टपासून प्राइम मेंबर्ससाठी सुरु होणार असून, सामान्य ग्राहकांना 2 ऑगस्टपासून प्रवेश मिळेल.
ॲमेझॉनवरील ऑफर्स
घरगुती उत्पादने: 80% पर्यंत सूट
इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज: 75% पर्यंत सूट
फॅशन व ब्युटी: 50% ते 80% पर्यंत सूट
स्मार्ट टीव्ही: 65% पर्यंत सूट
स्मार्टफोन्स: आयफोनपासून सॅमसंगच्या प्रीमियम मॉडेल्सवर मोठी सूट
याशिवाय, एसबीआय क्रेडिट कार्डवर 10% पर्यंत डिस्काऊंट, एक्सचेंज ऑफर्स आणि इतर आकर्षक डील्स उपलब्ध आहेत.
फ्लिपकार्टवरील ऑफर्स
78 एक्सक्लुझिव्ह फ्रीडम डील्स – पर्सनल केअरपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत
6 स्पेशल डील झोन्स – एक्सचेंज आवर्स, बंपर आवर्स, टिक-टॉक डील्स, रश आवर्स, 78 आवर्स फ्रीडम डील, प्राईस पॉईंट
आयसीआयसीआय व बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवर 10% डिस्काऊंट
फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डवर 5% कॅशबॅक व सुपरकॉईन्सवर अतिरिक्त 10% डिस्काऊंट
सेलसाठी तयारी कशी कराल?
तुमच्या पसंतीच्या प्रोडक्ट्सची विशलिस्ट तयार ठेवा आणि अधिक लाभ मिळवण्यासाठी प्राइम मेंबरशिप घ्या. अर्ली ॲक्सेसमुळे तुम्हाला बेस्ट डील्सवर पहिल्यांदा खरेदीची संधी मिळेल.