बीड प्रतिनिधी
परळीतील महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येला जवळपास २० महिने लोटले, मात्र अजूनही आरोपींचा थांगपत्ता लागत नसल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आता या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, तो पाहून माणुसकीही थरकते. मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठत महादेव मुंडेंचा गळा चिरून श्वसननलिका पूर्णपणे कापली, तसेच चेहरा, मान आणि हातावर तब्बल १६ वार करत अक्षरशः मुंडेंचा छिन्नविछिन्न मृतदेह केला होता.
गळ्यावर २० सेमी खोल वार, श्वसननलिकेसह रक्तवाहिन्याही कापल्या!
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, महादेव मुंडेंच्या गळ्यावर तब्बल २० सेंमी लांब, ७ सेंमी रुंद आणि ३ सेंमी खोल वार करण्यात आला होता. या जीवघेण्या वारामुळे श्वसननलिका आणि रक्तवाहिन्या पूर्णपणे कापल्या गेल्या होत्या. तोंडापासून कानापर्यंत १३ सेंमी लांब खोल वार देखील नोंदवण्यात आला आहे.
१६ वारांचे क्रौर्य – चेहरा, मान आणि हात फाडले
मुंडेंच्या संपूर्ण शरीरावर एकूण १६ तीव्र वार आढळले आहेत. विशेष म्हणजे, हे वार केवळ हल्ला करण्यापुरते नव्हते, तर त्यातून सूडाची आग स्पष्ट दिसते. डाव्या व उजव्या हातावर अंगठा, बोटे आणि तळहाताजवळ गंभीर जखमा असून, हे सर्व प्रतिकार करतानाचे चिन्ह आहे. मानेवरच्या वारांमुळे तोंडावरही खोल जखमा झाल्या.
हत्या २० ऑक्टोबरला, मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला
२० ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंडे यांनी मुलांना ट्युशनवरून घरी सोडले. त्यानंतर त्यांनी पिग्मी कलेक्शन करत विविध भागांत फेरफटका मारला. रात्री ९ वाजता वनविभागाच्या कार्यालयाजवळ त्यांची दुचाकी आढळली. दुचाकीवर रक्ताचे डाग होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांचा मृतदेह सापडला. यानंतर परळी पोलिसांत खळबळ उडाली होती.
पोलीस आश्वासने फोल, पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न
हत्या झाल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह पोलिस स्टेशनमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलीस अधिकारी यांनी आठ दिवसांत आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करण्यात आला. परंतु २० महिने उलटूनही एकाही आरोपीचा छडा लागलेला नाही. न्यायासाठी दरवाजे झिडकले तरी काहीच साध्य न झाल्याने पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह, जनतेचा उद्रेक संभवतो
या खून प्रकरणातील उघडपणे दिसणाऱ्या क्रौर्यपूर्ण हत्येने संपूर्ण मराठवाड्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांकडून चाललेली ढिसाळ चौकशी, तपासातील हलगर्जीपणा आणि आरोपींचा अद्यापही सुगावा न लागणे, या सर्वांमुळे सरकार व पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त होत आहे. आता हे प्रकरण क्राईम ब्रँच किंवा सीआयडी कडे देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
* न्याय मिळणार की ‘मृत्यू’ फाईलमध्ये गाडला जाणार?
* १६ वार करणाऱ्यांचा अजूनही शोध सुरू – की गोंधळ सुरू?
* पोलीस खाते झोपले की राजकीय दबावाखाली गप्प?
“हा हत्याकांड केवळ एका कुटुंबाच्या आयुष्यावर नाही, तर पोलिसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई होऊन आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” – स्थानिक नाग


