
• १०० युनिटच्या आतील वापरावर तब्बल २६% कपात; ७०% घरगुती ग्राहकांना दिलासा
मुंबई प्रतिनिधी
महावितरणने वीज दरवाढीचा धक्का दिला असतानाच, राज्यातील जनतेला सरकारकडून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात मोठी घोषणा करत १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी २६ टक्क्यांची दर कपात जाहीर केली आहे. ही घोषणा राज्यातील तब्बल ७०% ग्राहकांना थेट फायदा देणारी ठरणार आहे.
70% वीज ग्राहक 100 यूनिटच्या आतील असून 26% शुल्क कपात केवळ त्यांना लागू आहे.
70% बिजली ग्राहक 100 यूनिट से कम बिजली इस्तेमाल करते हैं और 26% शुल्क में कटौती केवल उन्हीं पर लागू है।
(विधान परिषद, मुंबई | दि. 16 जुलै 2025)#Maharashtra #SolarEnergy #MonsoonSession2025 pic.twitter.com/0WySSXsUCO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 16, 2025
राज्याच्या विधानसभेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी वीज दरवाढीबाबत सरकारला जाब विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी एमआऱ्सी (MERC) च्या त्रुटीपूर्ण आदेशांकडे लक्ष वेधत, सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही ‘टेरिफ रिफॉर्म’ योजना पुढे आणली असल्याचे सांगितले.
दरवाढीवर ‘ब्रेक’, कपातीला ‘गती’
राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की १०० युनिटच्या पुढील कोणत्याही वीज श्रेणीत दरवाढ होणार नाही. विशेष म्हणजे सर्व श्रेणींमध्ये वीज शुल्कात काही प्रमाणात कपात केली गेली आहे. त्यामुळे महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर सरकारने जनतेच्या बाजूने निर्णायक ‘ब्रेक’ लावला आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
राज्यात २ कोटी ८० लाख वीज ग्राहक, त्यातील ७०% ग्राहकांचा वापर १०० युनिटच्या आत
२६% दर कपात थेट या घरगुती ग्राहकांना लागू
घरगुती, औद्योगिक आणि कृषी – सर्व श्रेणींमध्ये दरकपात
स्मार्ट मीटरमुळे वीज चोरी आणि तांत्रिक तोटा रोखण्याची तयारी
सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन, शेतकऱ्यांना फायदा
MERC च्या गोंधळावर सरकारचा हल्लाबोल
फडणवीसांनी अधिवेशनात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला – वीज बिल आकारण्यात आलेली दुहेरी आकडेमोड. सरकारच्या म्हणण्यानुसार, तब्बल ९० हजार कोटी रुपयांची उलटसुलट हिशेबबाजी करण्यात आली होती. त्यावरुन जालन्यातील एका स्टील कंपनीला २०० कोटींचा लाभ देण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उघड केला.
‘ऊर्जा’साठी नवा मार्ग – सौर योजनेला चालना
राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात सौर ऊर्जा वापरावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी वीज खंडित झाली तरी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. घरगुती सौर पॅनल प्रकल्पांचा विस्तारही अधिक वेगाने होणार आहे.
जनतेसाठी खऱ्या अर्थाने ‘शक्ती योजना’
वीज दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय घरगुती ग्राहकांसाठी ‘शक्ती योजना’ ठरणार आहे. महागाईच्या काळात वीज बिलात सवलत मिळणे म्हणजे सामान्य माणसाच्या खिशाला दिलासा देणारे पाऊल आहे.
‘मिळालं सरकारकडून गिफ्ट, आता वीज बिलांची नाही भीती!’
सध्याच्या वीज दरवाढीच्या गदारोळात, फडणवीस सरकारचा हा निर्णय राज्यातील लाखो वीज ग्राहकांना दिलासा देणारा ठरेल, यात शंका नाही.