
ओडिशा वृत्तसंस्था
सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या नशेत तरुणाई मर्यादा पार करत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. मात्र, आता ही धोकादायक क्रेझ थेट लहान मुलांपर्यंत पोहोचली असून, एक चिमुकला मुलगा जीवाशी खेळत स्टंट करताना दिसून आला आहे.
या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ही घटना ओडिशा राज्यातील बौद्ध जिल्ह्यातील असून, एक १२ वर्षीय मुलगा थेट रेल्वे रुळांच्या मधोमध झोपून स्टंट करत असल्याचे यात दिसून येते. या मुलाच्या अंगावरून भरधाव रेल्वे जाते, आणि काही क्षणांत मुलगा उठून आनंदाने हसत आपला “कारनामा” साजरा करतो!
రీల్స్ కోసం ప్రాణాలతో చెలగాటం
ఒడిశా – బౌద్ జిల్లాలోని పూరునాపానీలో రీల్స్ పిచ్చిలో ట్రైన్ పట్టాల మధ్య పడుకున్న బాలుడు
దానిని ఫోన్లో వీడియో తీసిన బాలుడి స్నేహితులు
ముగ్గురు మైనర్లను అదుపులోకి తీసుకొని విచారిస్తున్న అధికారులు pic.twitter.com/tf7N5I5kVo
— Telugu Scribe (@TeluguScribe) July 6, 2025
थरकाप उडवणारा थरार
झारमुंडा रेल्वे स्थानकाजवळ २९ जून रोजी ही घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने रेल्वे रुळांवर झोपण्याचा जीवघेणा स्टंट करत सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. रेल्वे अक्षरश: त्याच्या अंगावरून गेल्यानंतर तो उठतो आणि दुसऱ्या मित्रासोबत विजयाचा जल्लोष करतो.
ही घटना एका तिसऱ्या तरुणाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर अपलोड केली. क्षणात हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आरपीएफसह स्थानिक पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.
दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात
या घटनेनंतर रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि बाउनसुनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. गावकऱ्यांच्या मदतीने स्टंट करणाऱ्या दोघा मुलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पालकांसह बालनगीर येथील आरपीएफ चौकीत नेण्यात आले असून, बाल न्याय कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे.
प्रसिद्धीच्या नादात जीवाशी खेळ
हा प्रकार केवळ या मुलांसाठीच नव्हे, तर रेल्वेच्या सुरक्षिततेसाठीही मोठा धोका निर्माण करणारा आहे. अशा कृतींमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होऊ शकते तसेच अपघात घडण्याची शक्यता वाढते. अशा स्टंटबाजीमुळे देशभरात आधीही अनेकांनी आपला जीव गमावला आहे.
रेल्वे प्रशासनाची जनजागृती
रेल्वे रुळ स्टंटबाजीसाठी नव्हेत. भारतीय रेल्वे प्रशासन वेळोवेळी शाळांमध्ये, रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहिमा राबवते. मात्र, या मोहिमांचा कितपत परिणाम होतो आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही घटना फक्त एका चुकलेल्या निर्णयाची परिणती नव्हे, तर समाजात वाढणाऱ्या दिखाऊ संस्कृतीचा गंभीर इशारा आहे. पालकांनी आणि समाजाने वेळेत हस्तक्षेप करणे ही काळाची गरज बनली आहे.