नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमधील बहुप्रतीक्षित टी-20 मालिका आजपासून (शनिवार, 28 जून) इंग्लंडमध्ये सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासमोर यजमान इंग्लंड संघाचे आव्हान असेल. ही पाच सामन्यांची टी-20 मालिका असून त्यानंतर तितकीच महत्त्वाची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका देखील होणार आहे.
भारताचा संभाव्य संघ:
स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, अरुंधती रेड्डी, क्रांती गौर.
इंग्लंडचा संभाव्य संघ:
डॅनी वायट-हॉज, सोफिया डंकले, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), पेज स्कॉलफिल्ड, एमी जोन्स (यष्टीरक्षक), अॅलिस कॅप्सी, एम आर्लॉट, चार्ली डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक:
पहिला सामना: 28 जून – नॉटिंगहॅम – सायंकाळी 7 वाजता
दुसरा सामना: 1 जुलै – ब्रिस्टल – रात्री 11 वाजता
तिसरा सामना: 4 जुलै – लंडन – रात्री 11:05 वाजता
चौथा सामना: 9 जुलै – मँचेस्टर – रात्री 11 वाजता
पाचवा सामना: 12 जुलै – बर्मिंगहॅम – रात्री 11:05 वाजता
थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण Sony Sports Network चॅनेलवर करण्यात येणार आहे. याशिवाय JioTV आणि Sony Liv App वर देखील ऑनलाइन स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध आहे.
वन-डे मालिकेचे वेळापत्रक:
टी-20 मालिकेनंतर 16 जुलैपासून 22 जुलैदरम्यान तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळवली जाईल. भारतीय संघ या मालिकेसाठीही सज्ज असून हरमनप्रीतच त्याचे नेतृत्व करणार आहे.
पहिला सामना: 16 जुलै – साउथम्प्टन – संध्या. 5:30
दुसरा सामना: 19 जुलै – लंडन – दुपारी 3:30
तिसरा सामना: 22 जुलै – चेस्टर ले स्ट्रीट – संध्या. 5:30
भारताचा महिला संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून इंग्लंडविरुद्धच्या या दौऱ्यात दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा यांच्याकडून संघास मोठ्या योगदानाची अपेक्षा असणार आहे.
प्रेक्षकांनी आज सायंकाळी 7 वाजता ट्रेंट ब्रिजवरील या सामन्याचा आनंद Sony Sports आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जरूर घ्यावा.


