मुंबई प्रतिनिधी
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, २५ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विसर्जन मिरवणुकांच्या काळात शहरातील प्रमुख मार्ग आणि संवेदनशील ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
विसर्जनादरम्यान आकाशातील हालचालींवरही पोलिसांची नजर राहणार आहे. कोणत्याही संशयास्पद हालचालीवर तातडीने कारवाई करता यावी, यासाठी Anti-Drone Squads तैनात करण्यात आले आहेत. अनधिकृत Drone किंवा संशयास्पद उडणाऱ्या वस्तूंचा मागोवा घेऊन त्यावर आवश्यक ती कारवाई करण्यासाठी ही पथके सज्ज राहणार आहेत.
मुख्य विसर्जन मार्गांसह संवेदनशील भागांमध्ये Rapid Action Force (RAF), State Reserve Police Force (SRPF), Force One आणि Quick Response Teams (QRTs) यांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय Riot Control Teams, Combat Teams आणि Home Guards चे जवानही बंदोबस्तात सहभागी होणार आहेत.
विसर्जन मिरवणुकांमुळे प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसानकडून आवश्यक त्या मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना विसर्जनाच्या वेळी शांतता आणि संयम राखून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतीही बेवारस वस्तू, संशयास्पद ड्रोन किंवा अवांछित हालचाल आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून त्याठिकाणी जाऊ नये. तातडीने 100 किंवा 112 या क्रमांकावर पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


