
नवी दिल्ली प्रतिनिधी
नवी दिल्ली | दिल्लीतील शिवाजी ब्रिज स्थानकाजवळ आज सकाळी एक धक्कादायक रेल्वे अपघात घडला. निजामुद्दीन येथून गाझियाबादकडे जाणारी एक प्रवासी रेल्वे रुळावरून घसरली. या घटनेत ट्रेनचा चौथा डबा रुळावरून घसरल्याचे प्राथमिक माहितीतून समजते.
या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. सध्या अपघाताच्या कारणांचा शोध सुरू असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली की नाही, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
रेल्वे अपघात घडल्याची माहिती मिळताच वरिष्ठ रेल्वे अधिकारी, सुरक्षा यंत्रणा व आपत्कालीन सेवा पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत.
या घटनेचा सविस्तर तपास सुरू असून, रेल्वे प्रशासनाकडून लवकरच अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.