
मुंबई, सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
कुर्ला : मुंबईतल्या कुर्ल्यात मोठा बस अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. बेस्टच्या बसने रीक्षाला चिरडलं असून इतरही वाहनांना बसने धडक दिली. या अपघातामध्ये सात ते आठ जण मृत पावल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक जण जखमी झालेले
आहेत.
कुर्ल्यातल्या एलबीएस रोडवर मोठा अपघात झाला. बेस्ट बसने अनेकांना उडवल्याची माहिती आहे. मार्केटमध्ये भरधाव वेगाने घुसलेल्या बेस्ट अगोदर रिक्षाला चिरडलं.यात रिक्षाचा चक्काचूर झाला. त्यानंतर बसने रस्त्यावरील इतर वाहनांना धडक दिली. या अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची प्रत्यमिक माहिती मिळत आहे.