
वांद्रे पूर्व,सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
शिवसेना विभाग प्रमुख कुणाल सरमळकर वांद्रे पूर्व १७६ विधानसभेतील नागरिकांच्या समस्यांवर एच ईस्ट वॉर्डच्या अधिकारी श्रीमती स्वप्ना क्षीरसागर यांच्याशी लोकहिताच्या दृष्टीकोनांनी विशेष बैठकीचे ११/१२/२०२४ रोजी आयोजन करण्यात आले.
वांद्रे पूर्व विधानसभेतील सर्व प्रभागांमध्ये महानगरपालिकेशी संबंधित कामे आणि नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना विभागप्रमुख “श्री. कुणालजी सरमळकर” यांच्या मार्गदर्शनाखाली आज एच ईस्ट वॉर्डच्या अधिकारी श्रीमती स्वप्ना क्षीरसागर मॅडम उपस्थितीत एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत प्रामुख्याने प्रभागांतील रस्त्यांची दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी स्वप्ना शिरसागर मॅडम यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
शिवसेना नेहमीच नागरिकांच्या समस्यांवर जलदगतीने उपाय शोधण्यासाठी पुढाकार घेत आलेली आहे. या बैठकीच्या माध्यमातून प्रभागातील नागरी विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळेल.