
दादर, सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सकाळी शासकीय मानवंदना प्रदान करून अभिवादन करण्यात आले.
माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी, माजी मंत्री श्री. राजकुमार बडोले, माजी कुलगुरू तथा माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव, माजी खासदार श्री. राहुल शेवाळे यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, मुंबई पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त श्री. राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी श्री. संजय यादव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.