
बिड प्रतिनिधी
सतीश भोसले उर्फे खोक्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जेलमध्ये त्याला पोलिसांनी बडदास्त राखणाऱा व्हिडिओ समोर आला.
त्यानंतर या प्रकरणी दोन पोलिसांनी निंलबन करण्यात आले आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही कारवाई केली आहे. या दोन्हीही पोलिसांना कारणे दाखवा नोटिश बजावण्यात आली आहे.त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नवनीत कावत यांनी दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन केल्याने बीड जिल्हा पोलीस दलातील अन्य पोलिस अधिकारी यांचे धाबे दणादणे आहे. दोन जणांनी अमानुष मारहाण करणे, वन्य प्राण्यांच्या शिकार या सारख्या गंभीर गुन्ह्यात खोक्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. पण खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असल्याचे संताप व्यक्त केला जात आहे.
न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी कारागृह आवारात खोक्या जेवणाचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांशी गप्पा मारत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओमुळे बीड पोलिस प्रशासनाची इभ्रत वेशीला टांगली गेली असल्याची चर्चा आहे.
खोक्या उर्फ सतीश भोसले याला अमानुष मारहाण प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. कोठडीत रवानगी होण्यापूर्वी कारागृहाच्या आवारात खोक्याला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
जिल्हा कारागृह आवारात बाहेरचा डबा आणून खोक्याला जेवण देण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याबरोबरच खंडीभर कार्यकर्ते त्याच्या दिमतीला उपस्थित होते. जेवण झाल्यानंतर खोक्याच्या हातावर मिनरल वॉटरओतताना कार्यकर्ता दिसत आहे.