
मुंबई प्रतिनिधी
गु.र.क्र. १४/२०२५ (पायधुनी पोलीस ठाणे, गु.र.क्र. १८३/२०२५), कलम १०३ (१), ११८ (१), ३ (५), १८९ (२), १९०, १९१ भा. न्या. सं. २०२३ सह कलम १३५ म.पो.का. (अपमृत्यू नोंद क्र. ११/२०२५, कलम १९४ भारतीय नागरीक सुरक्षा संहिता) या गुन्ह्यातील इसम विशाल राजेंद्र विश्वकर्मा (वय ४० वर्षे) याचा जे. जे. रुग्णालय येथे वैद्यकीय उपचारादरम्यान दि. १९/०२/२०२५ रोजी मृत्यू झाला आहे.
सदर इसम हा प्रयागराज, उत्तरप्रदेश येथील मूळ रहिवासी असून, त्याबाबत अथवा त्याच्या नातेवाईकांविषयी काही माहिती असल्यास गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-२, गु.अ. वि., संत गाडगे महाराज चौक, सातरस्ता सर्कल, आग्रीपाडा, मुंबई – ४०००११ या कार्यालयास कळवावे किंवा खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 ९८५०३२१५८९ / ९८२१६६३२२५