
बिड प्रतिनिधी
भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय गुंडा सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई याला सात दिवसांची पोलिस कोठडी शिरूर कासार न्यायालयाने सुनावली आहे.
सतीश भोसले याची दहशतीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच, त्याच्यविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तो पसार होता. पोलिसांनी त्याला प्रयागराज येथून अटक केली आहे.