
बिड प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण चांगेलच तापले आहे. या प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराड याला क्रमांक एकचा आरोपी केला आहे
मात्र आता देखील या प्रकरणात एक आरोपी फरार आहे. नुकतंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर आता संतोष देशमुख यांचा PM अहवाल समोर आला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे.
PM अहवालामध्ये धक्कादाय माहिती?
काही दिवसांपूर्वी सोशल सोशल मीडियावर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोमध्ये संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूर पद्धतीने करण्यात आली आहे हे दिसून येत आहे. तर आता संतोष देशमुख यांचा PM अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये देशमुख यांच्या हनुवटी, कपाळ आणि दोन्ही गालांवर जखमांच्या खुणा होत्या तसेच त्यांच्या पोटावर बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा खुलासा या अहवालामध्ये करण्यात आला आहे. याच बरोबर त्यांच्या नाकामधून रक्त आलेलं आहे. त्यांच्या छाती आणि गळ्यावर जखमांच्या खुणा होत्या. त्यांच्या दोन्ही बरगडीवर मारहाण करण्यात आली आहे.
देशमुखांच्या डाव्या खांद्यावर तीव्र जखमा, दंड, कोपर, मनगट, हाताच्या मुठींवर जखमा होत्या. मारहाणीमुळे जखमा काळ्या निळ्या झाले होते. संपूर्ण पाठ काळीनिळी झाली होती, त्यांच्या शरीरातील रक्त साखळले होते. इतक्या निर्दयीपणे संतोष देशमुखांना मारहाण झाली असं या अहवालामध्ये म्हटले आहे. याचबरोबर देशमुख यांना ज्या पाईपणे मारहाण करण्यात आली त्याचे 15 तुकडे झाले होते. पोलिसांना महेश केदार याच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ आणि जखमी अवस्थेतील फोटो सापडले आहे.
तपासात सीआयडीने पाच मोबाईल जप्त केले आहे. संतोष देशमुखांना मारहान करताना त्यांचे कपडे देखील काढण्यात आले होते. तसेच आरोपींनी यावेळी मोकारपंती या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडीओ कॉल देखील केला होता. अशी देखील माहिती समोर आली आहे.