
बिड प्रतिनिधी
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येतील मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे ‘SIT’ने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून समोर आलं आहे. या हत्येत क्रूरतेचा कळस झाला. मास्टर माइंड वाल्मीक कराड, घुले, आंधळे, यांच्या मालकीच्या आलिशान 10 गाड्या जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांची बँक खातीही सील केली आहेत.
यावरून महाराष्ट्राभर संताप व्यक्त होत आहे. हत्यारांना सोडू नका, अशीच सर्वत्र भावना आहे.
प्रचंड राजकीय दडपण असलेल्या या घटनेत ‘SIT’, ‘CBI’ आणि बीड पोलिसांनी खुबीने तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. आता या आरोपींची रसदवर तपासी यंत्रणेनं घाव घालण्यास सुरवात केली आहे. वाल्मिक कराड, फरार कृष्णा अंधाळे, सुदर्शन घुलेकडील अलिशान वाहन जप्त करण्यासह कोट्यवधीची संपत्ती जप्त केली आहे.
बीडमधीलसंतोष देशमुख हत्याप्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराड याच्याकडील अलिशान, महागडी वाहन ‘SIT’ ने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. मर्सिडीज बेन्झ, बीएमडब्ल्यू, इनोव्हा टोयोटा, फोर्ड इंडेवर, अशोक लेलँड, अशा वाहनांचा समावेश आहे.
वाल्मिक कराडला जमवलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती देखील गमावावी लागणार आहे. तसेच वाल्मिक कराडची महाराष्ट्रात अन् महाराष्ट्र बाहेर देखील संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. यात कोट्यवधी रुपयांचे प्लॉट, रो-हाऊसबरोबर जमीन आणि अलिशान, महागडी वाहन देखील वाल्मिक कराड याच्या नावावर आहे. काही मालमत्ता त्याच्या नातेवाईकांच्या नावावर आहे.
या हत्येतील आरोपी सुदर्शन घुले (टाकळीगाव, ता. केज) आणि फरार असलेला कृष्णा आंधळे (रा. मैंदवाडी ता. धारूर) याची देखील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. फरार कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला हत्या झाली. तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार आहे. कृष्णा आंधळे याच्याकडे पाच विविध प्रकारची वाहने असून धारूर आणि केजमधील बँकेत तीन खाते देखील आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी अपरहणासाठी काळ्या रंगाची स्काॅर्पिओ वापरण्यात आली होती. पोलिसांनी हे वाहन जप्त केले ते घुले याचे आहे. याच वाहनातून पुढे पोलिसांना हत्येसंदर्भात तब्बल 19 पुरावे मिळाले. सुदर्शन याच्या वडिलांकडे शेती आहे. सुदर्शन घुले याच्या संपत्तीचा शोध आता पोलिस घेत आहेत.