
वार्ताहर-स्वप्नील गाडे
मुंबईच्या खार पूर्व निर्मल नगर परिसरात १८ वर्षीय तरुणीवर पाण्यातून गुंगीचे औषध देऊन लैगिक अत्याचार करण्यात आला आहे या प्रकरणात दोन आरोपींवर निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे
18 वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तरुणीला घरी सोडण्याच्या नावाखाली लिफ्ट देत पाण्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
तरुणी बेशुद्ध होताच अज्ञात स्थळी दोघांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केल्याचा तरुणीने आरोप केल्याची माहिती मिळत असून तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास आरोपीनी जीवे मारण्याची धमकी दिली.
तरुणीने निर्मलनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी आरोपी फिरोज अब्दुल मोतीन खानसह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी निर्मलनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.