
सातारा प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्था सातारा येथे ज्यांना नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आता रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
या जाहिरातीतून “प्राप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक” भरती घेतली जाणार आहे. या सर्व पदांसाठी एकूण 188 रिक्त जागा असून , उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 16 फेब्रुवारी 2025 ला मुलाखतीसाठी आयोजित केलेल्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. तर चला या जाहिरातीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
पदाचे नाव
जाहिरातीनुसार “प्राप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक” या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
जाहिरातीनुसार एकूण 188 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण – कराड
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज प्रक्रिया –
पात्र असलेल्या उमेदवारांनी साध्या कागदावर आपला संपूर्ण बायोडाटा देऊन प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र हे आवश्यक असलेले प्रमाणपत्रे जोडून अर्ज करावा. हे सर्व डॉक्युमेंट्स वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी पडताळणीसाठी घेतले जातील.
मुलाखतीचा पत्ता – रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एसजीएम कॅम्पस, सैदापूर, कराड ता- कराड जि-सातारा पिन कोड-415124.
मुलाखतीची तारीख – 16 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या अटी
उमेदवारांनी कॉन्व्हेंट/इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण घेतलेले असावे .
उमेदवाराकडे इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये शिकवण्याची क्षमता असावी.
CBSE अनुभव आणि TET/CTET पात्रता असलेले उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे .
उमेदवारांना संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.