मुंबई प्रतिनिधी
अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात असतानाच तसेच हजारो कर्मचाऱ्यांच्या कपातीचा मुद्दा चर्चेत असताना इकडे महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचे स्वीय सहाय्यक आणि वाहन चालकांच्या पगारासंदर्भात राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
आमदारांचे स्वीय सहाय्यक आणि वाहन चालकांच्या पगारामध्ये भरघोस वाढ करण्याचा झाली आहे.
विधानमंडळ सदस्यांच्या स्वीय सहाय्यक, वाहनांच्या मानधनात वाढ झाली असून आता स्वीय सहाय्यकांना आता ४० हजार, वाहनचालकांना ३० हजार मानधन मिळणार आहे. स्वीय सहाय्यक आणि चालकांच्या आधीच्या पगारात दहा हजारांची वाढ झाली आहे. ही पगारवाढ १ ऑगस्ट पासून लागू होणार आहे.
आमदारांचे PA आणि ड्रायव्हर यांचा पगार वाढला, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
शासनाच्या निर्णयानुसार स्वीय सहाय्यकांचे मानधन ३० हजारांवरून ४० हजार करण्यात आले आहे. तर चालकांचे मानधन २० वरून ३० हजार करण्यात आलेले आहे. स्वीय सहाय्यक आणि चालकांची साधारण २५ ते ३० टक्के पगार वाढ झाली. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासदंर्भातील घोषणा केली आहे.
आमदारांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण
आमदारांचे दैनंदिन कामकाज सांभाळणाऱ्या दोन्ही घटकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने शासनाने हा पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. या मानधन वाढीमुळे सगळ्याच आमदारांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

