मुंबई प्रतिनिधी
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षादरम्यान एक धक्कादायक दावा समोर आला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने चीनकडून तब्बल ९ लाखांहून अधिक ‘नकली’ शस्त्रसामग्री मागविल्याची माहिती समोर येत आहे. या बनावट शस्त्रांमुळे अमेरिका आणि इस्त्रायलच्या सैन्याची दिशाभूल होत असल्याचा दावा काही आंतरराष्ट्रीय माध्यमांतून करण्यात आला आहे.
இவைதான் அமெரிக்கா ஈரானில் குறிவைக்கும் ஆயுதங்கள்.
டாங்கிகள், ஏவுகணை கேரியர்கள் மற்றும் பாலிஸ்டிக் ஏவுகணைகள் உட்பட 900,000 க்கும் மேற்பட்ட ஊதப்பட்ட டிகோய் மாடல்களை ஈரான் சீனாவிலிருந்து இறக்குமதி செய்ததாகக் கூறப்படுகிறது
– இவை அனைத்தும் காற்றை நிரப்பி உண்மையான டாங்குகள் போல… pic.twitter.com/ySv8zUBsrH
— Save Constitution – அரசியலமைப்பை காப்பாற்றுவோம் (@niayayakkural1) March 7, 2026
अलीकडेच इस्त्रायलच्या संरक्षण दलाने इराणच्या Mi-17 हेलिकॉप्टरवर हल्ला केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र नंतर या व्हिडीओबाबत शंका उपस्थित करण्यात आली. ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला, ते प्रत्यक्ष हेलिकॉप्टर नसून त्याची प्रतिकृती किंवा चित्र असल्याचा दावा केला जात आहे.
इराणकडून शत्रूची दिशाभूल करण्यासाठी एअरबेस आणि रनवेवर फायटर जेट व लष्करी उपकरणांची चित्रे तसेच प्रतिकृती तयार करण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे खरे शस्त्र आणि बनावट प्रतिकृती यामध्ये फरक ओळखणे कठीण जात असल्याची चर्चा आहे.
काही वृत्तांनुसार, चीनमध्ये तयार होणाऱ्या या विशेष बनावट शस्त्रांमध्ये फुगवता येणारे रणगाडे, मिसाइल कॅरिअर्स आणि बॅलिस्टिक मिसाइलच्या प्रतिकृतींचा समावेश आहे. यामध्ये हवा भरल्यानंतर ती दूरून खऱ्या लष्करी उपकरणांसारखी दिसतात. त्यामुळे विरोधी सैन्य दल त्यांनाच खरे लक्ष्य समजून हल्ले करत असल्याचा दावा केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर संबंधित व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून युद्धातील ही नवी ‘डमी शस्त्र’ रणनीती चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र या दाव्यांबाबत अधिकृत स्तरावरून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.


