सातारा प्रतिनिधी
व्यक्तीच्या जिवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकणाऱ्या Mephentermine Sulphate Injectionची अवैधरित्या विक्री करणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण १ लाख ५४ हजार ८० रु आहेपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत शिवराज पंकज कणसे (रा. अजिंक्य बाजार चौक, शाहुनगर, गोडोली, सातारा) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून ‘TERMIVA’ ब्रँडचे Mephentermine Sulphate Injection IP या औषधाच्या १३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. प्रत्येक बाटली २ हजार रुपयांना विक्री केल्याची माहिती त्याने चौकशीत दिली.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली व प्रतिबंधित औषधांच्या विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पथकाची स्थापना करून कारवाईचे आदेश दिले.
१३ फेब्रुवारी २०२६ रोजी बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसम शाहू चौक ते चारभिंती मार्गावर यामाहा मोटारसायकल (क्रमांक MH-11-CX-6070)वर ग्राहकांच्या शोधात फिरत असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान इंजेक्शनच्या १३ बाटल्या, ४०८० रुपये रोख, सुमारे १ लाख रुपये किमतीची मोटारसायकल आणि ५० हजार रुपये किमतीचा आयफोन असा एकूण १,५४,०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत संबंधित इंजेक्शन खरेदीचे बिल, डॉक्टरांची चिठ्ठी किंवा विक्री/साठवणुकीचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. बॉडी बिल्डिंगसाठी अवैधरित्या या औषधाचा वापर होत असल्याची कबुलीही त्याने दिली.
या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११८/२०२६ अन्वये भा.न्या.से. कलम १२३, १२५ व २७८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
या करवाईत पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फार्णे, पो.उ.नि. विश्वास शिंगाडे, पारीतोष दातीर, पोलीस अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, स्वप्नील शिंदे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, अमित सपकाळ, स्वप्नील कुंभार, अमित माने, ओंकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर यांनी सदरच्या कारवाईत सहभाग होता.


