
बीड प्रतिनिधी
सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष
देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. तसेच देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे.