
नवी दिल्ली वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) संध्याकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. या भाषणादरम्यान ते कोणती घोषणा करणार, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, उद्यापासून नवीन जीएसटी दर लागू होणार असल्याची पार्श्वभूमी असल्याने मोदींच्या या संबोधनाकडे अधिकच लक्ष लागले आहे. मात्र, पंतप्रधान कार्यालयाकडून भाषणाचा विषय अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेला नाही.
याआधीही मोदींनी अनेकदा राष्ट्राला उद्देशून भाषण करून महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे. २०१६ मध्ये नोटाबंदीची घोषणा, २०१९ मधील बालाकोट एअर स्ट्राईकनंतरचे भाषण, तसेच २०२० मध्ये कोरोना काळात जनता कर्फ्यू व आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा हे त्यातीलच काही ठळक क्षण.
मोदींच्या आजच्या संबोधनातून पुन्हा एखादा मोठा निर्णय जाहीर होतो का, याकडे आता देशवासियांचे डोळे लागले आहेत.