
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
बीड जिल्ह्यातील मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईड वाल्मीक कराड आज मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी स्वतःच्या एम एच २३ बीजी २२३१ या कारमधून पुण्यातील शिर्डी ऑफिसमध्ये दाखल झालाआला आहे. ९ डिसेंबर २०२४ बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांचा क्रूरपणे खून करण्यात आला होता . केव्हापासून या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध सुरू होता. जवळपास हत्येनंतर २२ दिवस ओलांडून देखील आरोपी हाताला लागत नसल्याने समाज आक्रमक झाला होता. २८ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यात सर्व पक्ष आणि मिळून या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महामोर्चा देखील काढला होता . त्यानंतर आज अखेर वाल्मीक कराड ने पुणे सीआयडी समोर आत्मसमर्पण केले आहे . आत्तापर्यंत याप्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली होती. तर तीन आरोपी फरार होते. या तिघांमध्ये मास्टर माईंड वाल्मिकी कराड हा एक होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने देशमुख हत्या प्रकरणात मी दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी मी न्याय देवता जे शिक्षा देईल की मी भोगायला तयार आहे असे म्हटले आहे.
मास्टरमाईंड वाल्मीक कराड काय म्हटला आहे व्हिडिओमध्ये ?
मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी शिर्डी ऑफिस पुणे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्याला फाशी शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषा पोटी माझं नाव त्याच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपास ते निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो त्यात ना शिक्षा द्यावी ते मी भोगायला तयार आहे असे वाल्मिकी कराड स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.