
पुणे(विभागीय प्रतिनिधी- सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक ३१)-खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ओबीसी )सेल पुणे आणि हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ वार रविवार रोजी वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुंधामाता नगर कात्रज येथे नवीन मतदार नाव नोंदणी अभियान, ई -श्रम कार्ड, आणि विश्वकर्मा कार्ड शिबिर घेण्यात आले.
खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ओबीसी) सेल पुणे अध्यक्ष श्री महेश इंगवले आणि हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे अध्यक्ष श्री पैलवान अजय साबळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक कार्याध्यक्ष पुणे श्री दत्ता कांबळे (युवा उद्योजक) यांच्या संयुक्त विद्यमाने सुंधा माता नगर कात्रज पुणे येथे नवीन मतदार नाव नोंदणी, आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, विश्वकर्मा कार्ड, मतदार नाव नोंदणी दुरुस्ती, सुंधा माता नगर येथील नागरिकांना एकाच ठिकाणी या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रविवारी दिनांक २९/१२/२०२४ रोजी यांच्या स्व:खर्चातून नागरिकासाठी घेण्यात आला. तरी याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी केले.
दैनिक युवक आधार प्रतिनिधीशी संवाद साधताना अध्यक्ष श्री महेश इंगवले म्हणाले राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा श्री अजित पवार यांच्या प्रेरणेतून आणि हडपसर विधानसभा आमदार श्री चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनातून हा शिबिर घेण्यात आला आणि राष्ट्रवादीच्या विचारधारा सर्वसामान्य तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून सामान्य जनतेचे समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत .शासकीय कार्यालय, बँक स्तरावर, मुलांच्या शिक्षणासाठी व शासनाच्या विविध योजनेसाठी आणि शासनाच्या विविध योजनेच्या लाभ घेण्यासाठी मतदान कार्ड, आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, विश्वकर्मा कार्ड आवश्यक्य आहे. तरी हे काम गोरगरीब नागरिकास शासकीय कार्यालयात जाऊन, वरील कागदपत्रे करून घेण्यासाठी हेलपाटे मारावी लागतात त्यामुळे गरीब जनतेचा आम्ही स्व:खर्चातून हा उपक्रम राबवत आहे कारण गरीब जनतेचा होणारा खर्च व वेळ ही वाचणार आहे . आणि हा उपक्रम महिन्याच्या जर रविवारी ठेवणार आहोत तरी नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे यावेळी आव्हान करण्यात आले.
यावेळी खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे श्री महेश इंगवले, हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे आणि अध्यक्ष श्री पै. अजय साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक विद्यार्थी कार्याध्यक्ष श्री दत्ता कांबळे (युवा उद्योजक), शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे श्री सुनील (आप्पा) कलशेट्टी, खडकवासला विधानसभा कार्याध्यक्ष ओबीसी सेल पुणे सौ गीता इंगवले, सावित्रीबाई फुले महिला मंडळ अध्यक्ष सौ नंदा थोरात, खडकवासला विधानसभा ओबीसी सेल सरचिटणीस सौ माया अहिरे, सुंधा माता नगरचे अध्यक्ष श्री शंकर चव्हाण, उपाध्यक्ष श्रीकृष्ण टमके, आदीसह सुंधा माता नगर मधील बहुसंख्य नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.