
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : शहरात पुन्हा एकदा २६/११सारख्या भीषण हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा गुरुवारी संध्याकाळी समोर आला. वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या संदेशात, तब्बल १४ पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला. एवढेच नव्हे तर, या दहशतवाद्यांकडे ४०० किलो आरडीएक्स असल्याचेही नमूद करण्यात आले.
The Mumbai Traffic Control Room received a terror hoax message on its official WhatsApp number on Thursday evening.
The message, sent from a mobile number, claimed that multiple human bombs had been planted in vehicles across the city and warned of a large-scale attack involving… pic.twitter.com/O6px2oSI7F
— Mid Day (@mid_day) September 5, 2025
या संदेशात शहरातील विविध वाहनांमध्ये मानवी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा उल्लेख होता. स्वतःला पाकिस्तानस्थित जिहादी संघटनेचा सदस्य असल्याचा दावा करत पाठवणाऱ्याने मुंबईत मोठा स्फोटक हल्ला घडवून आणण्याची धमकी दिली.
अचानक प्राप्त झालेल्या या इशाऱ्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली. शहरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून संवेदनशील ठिकाणी नजर ठेवली जात आहे. प्राथमिक चौकशीत हा इशारा खोटा असल्याचे समोर आले तरी, खबरदारीचा उपाय म्हणून सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
माहितीनुसार, या संदेशाचा स्त्रोत शोधण्यासाठी सायबर सेल तपास करत आहे. “संदेश खोटा असला तरी, सुरक्षेसंदर्भातील कोणतीही गोष्ट दुर्लक्षून चालत नाही. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे,” असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुंबईवर दहशतवाद्यांचे डोळे कायम असल्याने, अशा प्रकारच्या अफवांनीही पोलिसांना हादरवून सोडणे साहजिक आहे. नागरिकांनी अफवांना बळी न पडता सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.