
ठाणे प्रतिनिधी
ठाणेकरांसाठी सुवर्णसंधी! ठाणे महानगरपालिका (TMC) गट ‘क’ व गट ‘ड’ मधील तब्बल 1,773 रिक्त पदे भरणार आहे. प्रशासन, लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय अशा विविध विभागांमध्ये ही मेगाभरती होणार असून, इच्छुक उमेदवारांनी 2 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रियेची सुरुवात 12 ऑगस्ट 2025 पासून झाली असून, अर्ज फक्त www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच स्वीकारले जातील. सविस्तर जाहिरात व अर्जाची थेट लिंक उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ज व परीक्षा शुल्क
* अर्ज कालावधी: 12 ऑगस्ट 2025 दुपारी 2.00 वाजता ते 2 सप्टेंबर 2025 रात्री 11.59
* परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 2 सप्टेंबर 2025
* खुला प्रवर्ग: ₹1,000/-
* मागासवर्गीय/अनाथ: ₹100/-
* माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक: शुल्क माफ
(एकापेक्षा जास्त पदांसाठी वेगळा अर्ज व शुल्क आवश्यक. भरलेले शुल्क परत न मिळणारे.)
वयोमर्यादा (2 सप्टेंबर 2025 रोजीप्रमाणे)
* खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
* मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ.: कमाल 43 वर्षे
* दिव्यांग: कमाल 45 वर्षे
* विद्यमान शासनमान्य पदावरील कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा लागू नाही
* वयोमर्यादा सवलत: फक्त एकच, तीही जास्तीत जास्त असलेली लागू
महत्वाच्या लिंक
* ऑनलाईन अर्ज लिंक – येथे क्लिक करा
* अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
* भरती जाहिरात PDF – डाउनलोड करा
परीक्षेची प्रवेशपत्रे परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध होतील. इच्छुकांनी अर्ज करताना शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता केली आहे याची खात्री करूनच अर्ज करावा.