
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक १९ डिसेंबर) — राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जसे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, तसे माजी मंत्री छगन भुजबळ यांचेही आहेत. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी, छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतले नाही म्हणून (अजित पवार) पक्षाचे माजी मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांच्या समर्थनार्थ समता परिषद या त्यांच्या संघटनेने केलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर शाखेने बुधवारी प्रतिउत्तर दिले. अजित पवार यांची प्रतिमा दाखवत अवमान केला. अजित पवार यांचा अवमान आम्ही यापुढे सहन करणार नाही अशा कार्यकर्त्यांना छगन भुजबळ यांनी समजावून सांगावे, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पुणे पत्रकार परिषद बोलताना दीपक मानकर म्हणाले, भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्यवर नेते आहेत. गेले अनेक वर्ष ते मंत्री आहेत. अजित पवार यांनी आत्तापर्यंत विविध जाती धर्माच्या लोकांना संधी देऊन पुढे आणले आहे. भुजबळ यांना पक्षाने खूप काही दिले आहे त्यांच्या मुलाला काही महिन्यापूर्वीच विधान परिषदेवर संधी दिली आहे. सगळीच पदे त्यांच्या घरात गेली, तर कार्यक्षम तरुणांना संधी कधी मिळणार ? आत्तापर्यंत एवढं दिलं ते विसरलात का ? असा प्रश्न दीपक मानकर यांनी उपस्थित केला. नक्कीच त्यांच्या बाबतीत पक्षाने सकारात्मक विचार केलेला असेल, असे असताना भुजबळ आणि संयमाची भूमिका घ्यावी आणि आंदोलन करणारे समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाहीत, असे मानकर म्हणाले. फक्त त्यांनाच नाही तर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनाही मंत्रिपद दिलेलं नाही. ते शांत असताना भुजबळ मात्र विनाकारण आक्रस्ताळेपणा करत आहेत. राजकारण सभ्यता हवी ती आम्ही पाळतो,याचा अर्थ काहीही सहन करू असे नाही. छगन भुजबळ स्वतःला ओबीसीचे ते समजत असेल तरी राज्यात इतरही ओबीसी नेते आहेत. अजित पवार यांनी चार ओबीसी नेत्यांना मंत्रिपदावर संधी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलण्यास किंवा त्यांना विरोध करण्यास अजित पवार यांनी भुजबळ यांना सांगितले नव्हते. त्यामुळे मंत्रीपद न देण्यामागे जरांगे विरोधाचा मुद्दा नाही.दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांचे रक्ताचे नाते आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते गेले होते भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल. त्याचे आम्ही स्वागतच करू. असे दीपक मानकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.